जूनचं पहिलं दोन आठवडं गेलं तरीबी पावसाचा तप्पास नव्हता. कोल्हापूरात
कवा धरनं घुटमळत्योय पन पुन्याकडं सरायचं काही नाव नाय
पठ्ठ्याचं. त्यो इतका रग्गेलपना दावतोय तर म्या म्हनलं, या बारीला आपणच
जावं सातार्या पतुर ! चंदन - वंदन वर जाऊन लई दिस झालं होतं तवा या
बारीला त्यांना भेटायचं नक्की क्येलं. पावसाचीबी गाठ पडायला म्हनलं
तेव्हडचं निमित.
बेलमाची गावातून दिसणारा चंदन किल्ला
चंदन-वंदन मधलं बेचकं
पायथ्याचं मंदीर, मागे वंदन गडाचा पसारा
दुपारला अडीचला पुनं सोडलं आन् गाड्या भुईंज कडं हाकल्या.
आवंदाच्या टायमाला आमच्या मंडळी त्यांच्या धाकल्या बहीनीसंगट
आल्या व्हत्या. आप्पांच्या गावचा म्हंजी तळेगावच्या जोश्यांचा हृषीकेश
होता, श्रीकांत त्याच्या कुटुंबाला घेऊन हाजीर व्हता आनी पुन्यातूनच वृंदा
आनी मैत्रयीनी वर्दी दिली व्हती. शिवापूरला च्या पिऊन घेतला आन गाड्यातनी
तेलं भरून घेतली. पुढला च्या वाई फाट्यावर घ्येतला. भुईंज
मधून गाड्या डाव्या अंगाला बेलमाची गावाकडं जानार्या वाटंवर घातल्या न
घातल्या तोच पावसाची बारीक सर आली. पठ्ठ्या अखेरीस भेटलाच तर ! गाड्या
वरच्या बेलमाचीत लावल्या अन् सरल खिंडीकडं निगालो. समदी मंडळी फोटू काडत
काडतच चालली व्हती.
फोटू सेशन
मावळतीच्या अंगाला वैराटगड डोस्कं ढगात टाकून बसला
व्हतां. कदी मदी त्याच्या टकूर्यावर मावळतीचं सोनं दिसत व्हतं. त्याच्या मागल्या बाजूनं महाबळेशराचं
पठार. लैच झ्याक नजारा ! तिथंन पावलं काय निघना. मदीच आभालाच्या घोंगडीला भोकसं पडून त्यातनं सुर्व्याची
किरनं जिमिनीवर सांडत व्हती. फोटू काढत अन् करंवंद खात खात चंदन-वंदनच्या
मधल्या टापावरं पोचलो.
वैराटगड अन् आजूबाजूला सांडणारी किरणे
आभाळाला पडलेली ठिगळं
आभाळाला पडलेली ठिगळं
मावळतीच्या सोनसळी रंगात न्हाऊन निघालेलं बेलमाची
वैराटगडावर पसरलेलं मावळतीचं सोनं
वंदनची वाट तर लगेच घावली. चंदनकडं जानारी वाट
गडाच्या भिताडाला वळसा मारून जानारी व्हती. म्या अन् श्रीकांतनं थोडं
म्होरल्या अंगाला जाऊन बघितलं, पर लैच घसारा ! म्हागारी फिरलो.
अंधारायला झालं व्हतं तवा बिगी बिगी पावलं उचलीत वंदन गडावरला दर्गा गाठला.
भणाभणा वार्याचं फटकं बसत व्हतं अन् पाऊस उगा गोमुत्र शिंपडल्यावानी
पडंत व्हतां.
चंदनच्या डोक्यावर चाललेला ढगांचा खेळ
मपलं बारदान अन् मागं चंदनचा कडा
वंदनचा बुरूज
अखिल डोंगरयात्रा महिला मंडळ - एका मावळत्या क्षणी
चंदन जवळच्या टापावरून दिसणारा वंदनचा पसारा
श्रीकांत एका निवांत क्षणी (फोटो : हृषीकेश जोशी )
चंदनची वाट शोधाताना मी आणि श्रीकांत
दर्ग्याच्या अंगनात, घरनं बांधून आनलेलं जेवान सोडलं आनिक
समदी खान्यावर तुटून पडली. कवाधरनं पोटात कावळं वरडत व्हते. समदं
संपवून नवाच्या काट्याला सगळी दर्ग्यात पार आडवी ! मंग आमच्या मंडळींच्या
आर्जवावर गान्याच्या भेंड्या सुरू झाल्या. दोन तीन घंटे गळे फाटूस्तवर
आम्ही आरडत व्हतो. पावसाचा शिडकावा अन् भनाननारा गार वारा ! थंडी लागली नाय
तर नवल ! सगळी मंडळी गप गुमान पडली.
वृंदाने काढलेला हादडीचा फोटो
पहाटं पाचच्या टायमाला म्या
सुमडीत दर्ग्यासमोरल्या तळ्याकडं बसून आलो. लईच काकडं भरलं व्हतं. सातला
मंडळी उठली अन् धुकाटातच मागल्या कड्यावरं जमली. ढगांची लै दाटी झाली
व्हती. उगवतीला चंदनच्या अंगाखाद्यावरून मधल्या खिंडीत येत ढगांच्या आंघुळी
चालल्या व्हत्या. दोन चार पवनचक्क्या पल्याडल्या टापावरून
आपल्या माना वर काढून हा सारा खेळ न्याहाळीत व्हत्या. ढगांवर मधिच
सूर्व्याची किरणं पडून चमकित व्हती. सकाळ्च्या पारी लैच झ्याक दिसत व्हतं
सारं. फोटू काढून सामानाची बारदानं बांधली.
ढगांचा खेळ
ढगांमधून माना वर काढून पहाणार्या पवनचक्क्या
:)
ढगांमधून माना वर काढून पहाणार्या पवनचक्क्या
चंदन-वंदनच्या मधल्या बेचक्यात तयार होणारे ढग
ढगांमधून माना वर काढून पहाणार्या पवनचक्क्या
धुकाटात हरवलेला वंदनचा बुरूज
गडावर प्यायच्या पान्याचा
ठनठनाट व्हता तवा च्या खाली गावातच घेनार व्हतो. बारदानं पाठीला
मारून गडावरच्या धुकाटात शिरलो. अजून एक भली थोरली दर्ग्यागतच इमारत
पाहिली. एक तीन दरवाज्याचं बैठ कोठारबी हाय. पर दरवाजात लैच गचपण
माजलं व्हतं. एका दरवाजातून आत डोकावलो तर वाघळाच्या मुताच्या वासाची घान उठली होती. तसाच मागं फिरलो एक दोन फोटू काढलं आन परतीच्या वाटेवर निघालो.
वाटेत अजून एक दोन तळी लागली. अन् पडक्या वाड्यांची जोती बी दिसली. महाराजांच्या काळात गडावं मोप राबता असनार.
दरवाजाकडं दगडी जिनं उतरतं झालो. वरच्या दरवाज्यावर एक फारसी भासेतला
शिलालेख घावला. आतमदी पहारेकर्याच्या देवड्याबी हायेत. त्यामधूनच वरच्या
बुरजावर जायला भिताडातून एक बोळकांडं आहे. त्याच्याबी तोंडावर लैच गचपण. खालच्या ढासळलेल्या तटबंदीतून दरवाज्याकडं गेलो. या दरवाज्यावर मात्र
गणेशाची मूर्ती अन् कमळं कोरली व्हती. फोटू काढलं अन बेलमाचीची वाट धरली.
रानभुली
दर्ग्यासमोरच्या तळ्याकडे जाणारी कमान
रानभुली
अजून एक दर्गा
रानमेवा-डोंगरची मैना
कोठारं
रानभुली
दगडी पायर्या
पहारेकर्यांच्या देवड्या
दरवाजा
फारसी शिलालेख
दरवाज्याची कमान
दरवाज्याजवळच्या बुरूजावरील गणेश मुर्ती आणि कमळ
डोंगरयात्राचे शिलेदार
माझ्या जिवाभावाच्या मैतराशी भेट झाली अन् जीवाला कशी शांतता लाभली व्हती.
आम्हास्नी सोडाया पार पुन्यापत्तुर साथ केली पावसानं. पावसाची सुरूवात तर
लैच झ्याक झाली हाय. आता म्होरल्या भटकंतीचे बेत आखाया आम्ही मोकळं !
16 comments:
जमलंय.
जोहार मायबाप !
आवडलं, मस्त लिहीलं आहेस :)
apratim agdi rangadi bhashet !!!
jamlay malak !!!!
:)
mast ahe! photos tar lai bharii!
Zakassssss...re mitra....
Surendra
बेष्ट! खपल्या गेलो आहे! :(
लई झाक....औन्दाला लैच आवडला बर्र का...औ...ह्ये भी जमतंय म्हनायचं कि....
धन्यवाद मित्रहो !
आत्ता र तुझ्या...!! या टायामास न्हाय जमल यायला संग... पन पुढच्या पारीला हाय बग.. !! बाकी तु लीव्हतोस एकदम झाक, बरका...!!
एकदम झ्याक .. फोटू बी लई भारी..
मस्त रे.. भारी लिहिलेय...
Laich bhari :))
laich vangal zalay appa...
Khupach mast lihilays amol! Ani chayachitrana pan ekdam zakkas. Maja aali tya divashi, parat nakki jau!:)
निसर्गाची विहंगम रूप तू आज आमच्यासमोर मांडले. तुझे ट्रेकिंग वरील हे असले सचित्र लेख पाहून मी सुद्धा जर्मनीतून आल्प वर चढाई केली.
त्याबद्दल लिहीन सवडीने
पण माणसाला निसर्गाच्या सहवासात जाण्यास प्रवृत्त करणे हि एक अनोखी समाजसेवा तुझ्या लेखातून आणि अनुदिनीतून पार पडत आहे.
टिप्पणी पोस्ट करा